डोंबिवलीवासीयांना केमिकलच्या दुर्गंधीतून मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळणार
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सतत्याच्या पाठपुराव्याला यश
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या रासायनिक कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक गाळावर शुध्दीकरण प्रक्रिया करून गाळातील रासायनिक चिखल (sludge) बाजूला काढून उर्वरीत पाणी जवळच वहात असलेल्या मुख्य नाल्यात सोडण्यात येते. परंतु अशाप्रकारे शुध्दीकरण केलेल्या सदर पाण्यात ३५% ते ४०% रसायनाचा अंश रहातोच असे अनेक वेळा सिध्द झाले आहे. हे केमीकल युक्त पाणी नाल्यात सोडण्यात आल्यामुळे आणी सदर नाला डोंबिवलीतील अनेक भागातून फिरत जाउन तो डोंबिवली खाडीत विसर्जित होत असल्याने डोंबिवली परीसरात केमीकलची दुर्गंधी पसरून नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो.
यातून सुटका होण्या साठी सदर प्रक्रिया युक्त पाणी एका बंद पाईपद्वारे डोंबिवली खाडीत सोडण्यात यावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडून आल्या पासून म्हणजे २०१४/२०१५ पासून सातत्याने विविध स्तरांवर प्रयत्नशील आहेत. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश म.औ.वि.मं चे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडीतराव यांना दिनांक २४ जानेवारी २०१८ च्या पत्राद्वारे त्यांनी दिले.
त्यांच्याकडून उत्तरदाखल आलेल्या दिनांक १५ फेब्रू.२०१८ च्या अहवालानुसार सदर प्रकरण म.औ.वि.मं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सेठी यांच्याकडे निविदा प्रक्रियेसाठी गेले असल्याचे समजले.
यावरून खा.डॉ. शिंदे यांनी संजीव सेठी यांना दिनांक ७ मार्च २०१८ च्या पत्राद्वारे सदर प्रकरणी तातडीने पुढील कार्यवाही करून सदर काम चालू होण्याच्या दृष्टीने पुढील कारवाई तातडीने करावी अशी विनंती केली असून सदर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून लवकरच ह्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
या मुळे कल्याण डोंबिवली परीसरातील जनतेला केमीकलच्या दुर्गंधीच्या त्रासातून लवकरच मुक्तता होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी कळवीले आहे.