डोंबिवलील महिला महाविद्यालयाला कोणी वाली नाही,विद्यार्थिनींंच्या सख्येत घट,इमारत धोकादायक
(श्रीरामकांदु)
डोंबिवली – २५ वर्षापूर्वी डोंबिवली परिसरातील महिलांना शिक्षणाासाठी मुंबईला जावे लागे याचा त्याना त्रासही होत होता डोंबिवलीतच महिलांना शिक्षण घेता यावे म्हणून जनरल एज्युकेशन शिक्षण संस्थेने मोठया अपेक्षेने स वा जोशी विद्यालयाच्या संकुलात ना दा ठाकरसी विद्यापीठाचे महिला महाविद्यालय सुरु केले सुरवातीला या महाविद्यालयात सुमारे ८०० ते १००० पर्यत विद्यार्थिनी शिक्षण घेत हेात्या पण गेल्या काही वर्षात महाविद्यालयाकडे कर्मचारी,व विद्यापीठाने दुर्लक्ष केले त्याचा परिणाम आज संख्या अवघी १००-१२५ पर्यत घसरली आहे.जेाशी संकुलात ज्या वास्तूत हे महाविद्यालय आहे ती इमारत ८० वर्षापूर्वीची असून ती धोकादायक झाली आहे या ठिकाणी संस्थेने नवी वास्तू बांधून येथे ब्लॉसम इटरनॅॅशनल स्कूल सुरु करण्याची येाजना केली आहे .दरम्यान तीन वर्षे हे महाविद्यालय शाळेच्या तीस-या मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये हलवण्यात येणार आहे.
महाविद्यालयाची वास्तू ८० वर्षे जुनी असून सर्व वर्गाच्या छताचे प्लास्टर कोसळले असून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत.तसेच सध्या महाविद्यालयात परीक्षा सुरु असून बरेच दिवस कचरा साफ केलेला नाही,प्रचार्या ज्या आहेत त्या दोन वर्षे प्रभारी आहेत ज्या इमारतीत हे महाविद्यालय सुरु आहे ती इमारत ८० वर्षापूर्वीची असून ती धोकादायक झाली आहे तसेच या जागेत भव्य इमारत उभी करण्यात येणार असून तेथे ब्लॉसम इटरनॅॅशनल स्कूल सुरु करण्यात येणार आहे.दरम्यान हे महाविद्यालय कल्याण येथील संस्थेच्या न्यू इंग्लीश शाळेत सुरु करण्यात यावे असा प्रस्ताव संस्थेने विद्यापीठाला पाठवला होता मात्र त्याला विद्यापीठाने नकार दिला व म्हणून हायस्कूलच्या इमारतीत तिस-या मजल्यावर शेड टाकून सोय करण्यात येणार आहे.ना दा ठाकरसी विद्यापीठ हे महाविद्यालय चालवित असून जनरल एज्युकेशन संस्थेला कोणतेही अधिकार नाही यामुळे या महाविद्यालयाला कोणी वाली नाही.
महिला विद्यालय बंद करणार नाही
महिला महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही व स्थलांतर पण करणार नाही जोशी शाळेच्या इमारतीत सर्व सुविधा देऊन दोन तीन वर्षासाठी हे महाविद्यालय हलवण्यात येणार असून विद्यार्थीनींना कसलाही त्रास होणार नाही अशी काळजी घेण्यात येईल मात्र या महाविद्यालयाची जबाबदारी विद्यापीठाची असून विद्यापीठ लक्ष देत नाही व आम्हाला कसलेही अधिकार नाहीत असे मत जनरल एज्युकेश सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप गोसावी यांनी व्यक्त केले आहे.