डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले,
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२५ – काल रात्रीपासून डोंबिवलीत जोरदार पावसाने डोंबिवलीला झोडपून काढले आज दुपार पर्यत जोरदार सरी कोसळत होत्या. दुपार नंतर मात्र पावसाचा जेार कमी झाला. औद्योगिक निवासी भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना सुटटी देण्यात आली. पश्चिम डोंबिवलीतील साई लीला या धोकादायक इमारतीच्या गॅलरीचे प्लास्टर पडले मात्र यामध्ये कोणी जखमी झाले नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगीतले.
डोंबिवलीत सोमवारी अनेक भाग मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते. कोपर रोड, ठाकुर्ली, आजदे, सांगाव नांदिवली आदि भागासह निवासी भागातील मिलापनगर येथील मोठया नाल्याची संरक्षक भिंतीला भगदाड नाल्याचे पाणी मिलापनगर भागात शिरले अशी माहिती शिवसेनेचे या भागाचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.मोबाईल कंपन्यांनी चेंबरसाठी खडडे खणल्याने त्यात दुचाकीस्वार,नागरिक पडत असल्याची तक्रार त्यानी केली. पहिल्याच पावसात डोंबिवली जलमय झाली असून पालिका प्रशासनाचा नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे. डोंबिवली काही भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने त्यात कोणी जखमी झालेले नाही डोंबिवली ग्रामीणसाठी असलेल्या ‘इ ‘प्रभागात असलेल्या आपतकालीन कक्षाला जागा नसल्याने कर्मचारी बाहेरच उभे होते त्याना कसलेही साहित्य देण्यात आले नाही अशी तक्रार कर्मचार्यांनी केली.