डोंबिवलीत ५४ हजारांची घरफोडी
डोंबिवली – सुनील नगर येथील जानकी व्हिला या इमारती मध्ये राहणारे विनय पुजारी हे काल सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप कशाने तरी उघडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व घड्याळ असा मिळून एकूण ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी विनय यांनी रात्री डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: