डोंबिवलीत ५० हजाराच्या बनावट चलनी नोटासह ४ अटकेत
डोंबिवली -भारतीय चलनातील २००० रुपयाच्या बनावट २५ नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोदन शेख ३२ रा. मुंब्रा, साईर अली अब्दुल जहीर शेख २७ उरण, राजू अताउर शेख २८ मुसाफिर खाना मस्जिद मुंबई, मुबारक मजबूर शेख २६ मुंब्रा अशी आरोपीची नावे आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा बस स्टॉप जवळ वरील आरोपी बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. दुपारीसाडे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी या परिसरात दिसताच पोलिसांनी घेतलेल्या झडतीत या चौघाकडे २००० रुपयाच्या २५ बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा याच आरोपींनी तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दखल केला आहे.
Please follow and like us: