डोंबिवलीत हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा बेशिस्त रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्यात यावी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्यामुळे डोंबिवली शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वरांवर सोमवार पासून कारवाईस सुरुवात केली .मात्र या कारवाईस प्रवासी संघटना प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाले मंच (पाम)आणि लाल बावटा रिक्षा युनियन यांनी एकत्रित येऊन विरोध केला आहे.हेल्मेट सक्ती पेक्षा बेशिस्त वाहतुकीस शिस्त लावण्याची मागणी करण्यात आली
दुचाकीवरील वाढते अपघात लक्षात घेता हेल्मेट घालणे आवश्यक असल्याने डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली . यावेळी काही जणांनी विरोध केला.मात्र त्याला न जुमानता हि कारवाई सुरु ठेवून सोमवारी दिवसभरात सुमारे 25 जणांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली.दुचाकी वाहन चालकांसोबतच्या मागील बसलेल्या व्यक्तीने हि हेल्मेट घातले तर त्या दोघांच्या हि फायद्याचे आहे.पहिल्या टप्प्यात वाहनचालकाला सक्ती करणार असून नंतर पुढील कारवाई करणारा असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.पण या कारवाईस प्रवासी संघटना प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाले मंच (पाम)आणि लाल बावटा रिक्षा युनियन यांनी एकत्रित येऊन शहरातील हेल्मेट सक्ती पेक्षा बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी म्हणून डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी डोक्यात हेल्मेट घालून निवेदन देऊन निषेध नोंदविला .तसेच वाहतूक विभागाने हेल्मेट न घालणाऱ्यांबरोबरच मुजोर रिक्षाचालकांवर हि कारवाई करावी,शहरातील विविध मार्गावर अनधिकृत रिक्षावर कारवाई करावी , उद्धटपणे वागणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच येत्या 25 मार्च पर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.तर याला विरोध करण्यापेक्षा याच्या मागचा हेतू लक्षात घेऊन स्वतःचा जीव वाचणार असल्याने नागरिक आणि प्रवासी संघटनांनी विचार करून पोलीसांना सहकार्य करावे असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमास हरताळ फासण्याचे काम या दोन्ही संघटना करीत असल्याची चर्चा शहरात होत आहे.