डोंबिवलीत सर्व्हिस सेंटर मालकाला नोकरांनी घातला लाखोंचा गंडा,दोन जणांंना अटक

ठाणे येथे राहणारे अभिषेक नायर यांचे डोंबिवली पूर्व येथे ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सेंटर आहे .या सर्विस सेंटर मध्ये निलेश भोर व मनीष चिकने हे दोघे जण काम करत होते .या दोघांनी सर्व्हिस सेंटर मध्ये आलेल्या 560 ग्राहकापैकी 277 ग्राहकांनि दिलेली रोकड जमा न करता परस्पर लांबवली .या दोघांनी मिळून तब्बल 21 लाख 64 हजार 756 रुपयाच अपहार केला .सदर बाब नायर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात निलेश भोर व मनीष चिकने विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी निलेश भोर व मनीष चिकने विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
Please follow and like us: