डोंबिवलीत श्वानदंश जागृती दिंडीचे आयोजन

डोंबिवली – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन माध्यमातून श्वानदंश जागृती दिंडी आणि श्वानदंश जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर दिंडीचे स्वागत कल्याण डोंबिवली महापालिका महापौर विनिता राणे करणार असून या विषयी होणाऱ्या सभेत उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पूर्वेकडील गणेश मंदिर संस्थान येथे गुरूवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत श्वानदंश जागृती दिंडी काढण्यात येणार आहे. सदर दिंडी गणेशमंदिर डोंबिवली पूर्व, फडके रोड, बाजीप्रभू चौक, चार रस्ता, टिळक चौक, सर्वेश हॉल मार्गे ब्राह्मणसभा आणि गणेशमंदिर येथे समारोप होणार आहे. या दिंडीत विविध शाळेचे विद्यार्थी, स्काऊट पथक, इंटरअॅक्टर राष्ट्रीय सेवा योजना, कॉलेज विद्यार्थी, श्वान प्रेमी, प्राणी मित्र, पाळीव श्वानधारक, मोजके पाळीव श्वान, रोटरीयन्स, रोटरॅक्टर्स आणि पशुवैद्यक सहभागी होणार आहेत.

महापौर विनिता राणे दिंडीचे स्वागत करणार असून त्यानंतर होणाऱ्या सभेत त्या या विषयी विचार मांडणार आहेत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात डोंबिवलीकरांनी सहभागी व्हावे अशी विनंती रोटरीचे प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अकोले यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email