डोंबिवलीत श्रीराम महायज्ञाचे आयोजन  

डोंबिवलीत पहिल्या १०८ कुंडीय भव्य श्रीराम महायज्ञाचे आयोजन 

 (श्रीराम कांदु)

डोंबिवली – मुंबईतील पहिला १०८ कुंडीय भव्य श्रीराम महायज्ञ डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञासाठी जगदगुरु श्री. विनैका बाबा महाराज उपस्थित राहणार आहेत. श्री राम लोकसेवा संस्थेच्या वतीने रविवार १८ मार्च पासून रिजेन्सी ग्राउंड , दावडी नाका, डोंबिवली पूर्व येथे  या महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना यादव यांनी दिली आहे. या श्रीराम महायज्ञासाठी अयोध्या ,मथुरा-वृंदावन ,काशी .प्रयागराज , चित्रकुट , हरीद्वार इत्यादी ठिकाणाहून साधूसंत येणार आहेत. यात संतांचे प्रवचन , रामलीला इत्यादी भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. या महायज्ञाचे रविवार २६ मार्च रामनवमीच्या दिवशी  यज्ञाचा समारोप होणार आहे. ज्ञाची वेळ सकाळी ८ ते दुपारी वाजेपर्यत १ असून राजेश रामायणी २ ते ५  यावेळेत रामकथा सादर करतील. तसेच ७ ते १० वाजेपर्यत मथुरेतील  वृदावन कलाकरांच्या रामलीला सादर केली जाणार आहे. ज्या भाविकांनी या महायज्ञात सहभागी होण्यासाठी सतेन्द्र तिवारी – ९८६०२१४३२९ यावर संपर्क करण्याची मुन्ना यादव यांनी केले आहे. या महायज्ञाचे  व्यवस्थापक सिया शरणदास करत आहे.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email