डोंबिवलीत वादळी वारे आणि पावसाचा शिडकाव
(श्रीराम कंदु)
डोंबिवली- दुपारी तीव्र उन्हाचे चटके व त्या मुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक वादळी वाऱ्याने पावसाची चाहूल लागली मात्र पावसाचा शिडकावा झाला.
आज सकाळपासून डोंबिवलीत ढगाळ वातावरण होते मात्र नंतर तापमान वाढल्याने व ते 41 अशापर्यंत गेल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त होते 5 नंतर मात्र वातावरण बदलू लावले वादळी वारे सोबत धुळीचे लोट यामुळे सर्वत्र अंधुक वातावरण निर्माण झाले जोरदार वाऱ्यामुळे जोशी शाळेजवळ झाड पडल्याची तक्रार होती सुरवातीला पावसाचा शिडकावा झाला नंतर मात्र पावसाचे प्रमाण वाढले यामुळे अचानक आलेल्या पावसाने डोंबिवलीकराची धावपळ झाली काही वेळाने पाऊस थाबला त्या मुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित होत होता.
Please follow and like us: