डोंबिवलीत राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व प्रथमच जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न 

(श्रीराम कांदु)
      बारा जानेवारी हा योगायोगाने प्रखर हिंदुत्ववादी दिवस आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोगलांच्या जुल्मी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्वार्थाने सर्व क्षेत्रात पारंगत करुन शिवारायांना घडविणाऱ्या  राजमाता जिजाऊंचा व इंग्रजांच्या जुल्मी राजवटीत संपूर्ण जगाला हिंदू धर्माचे महत्त्व पटवून देणारे व सशक्त बलवान तरुण पिढीचा आग्रह धरणारे स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तीमत्वांचा जन्मदिवस. अशा दिवशी शिक्षण व कला क्षेत्रात संस्कारक्षम पिढी घडवून त्यांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा देणाऱ्या शिक्षिकांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देताना मला आनंद होत आहे असे उद्गार राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत काढले.
    विदर्भ मराठवाडा रहिवाशी सेवा संस्थे द्वारे प्रतीवर्षीप्रमाणे डोंबिवली पूर्वेकडे इंदिरा चौकात राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व प्रथमच जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष दत्ता मळेकर व सहकारी यांनी आयोजन केले होते. ओंकार शाळेच्या संस्थापिका दर्शना सामंत ,चंद्रशेखर साने विद्यामंदिरच्या संस्थापिका अश्विनी साने, शिक्षिका व श्रीकला संस्कार संस्थेद्वारे कलाकार घडविण्याचे अविरत कार्य करणाऱ्या दिपाली काळे,भविष्यातील गरज ओळखून अद्यावत संगणक व वेब शिक्षण देणाऱ्या उमा गणपुलेव नृत्य क्षेत्रात विद्यार्थी तयार करणाऱ्या वैशाली दुधे या पाच शिक्षिकांचा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते यंदा प्रथमच राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी  शिवसेना संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे ,भाजपचे पूर्वमंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा कामगार नेते नंदू परब ,आर.पी.आयचे उपाध्यक्ष माणिक उघडे, सभापती खुशबू  चौधरी,नगरसेवक मुकुंद पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email