डोंबिवलीत रविवारी ६ मे रोजी “सायकल” कलाकारांशी संवाद
डोंबिवली – रविवार दि. ६ मे २०१८ रोजी दुपारी २.४५ वा. टिळक थिएटर मधील सायकल या नवीन मराठी चित्रपटाच्या शोसाठी डोंबिवलीतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम, डोंबिवली सायकल क्लब व प्रतिमा फिल्म सोसायटी या संस्थांनी यातील डोंबिवलीतील बालकलाकार मैथिली पटवर्धन, तसेच दिग्दर्शक प्रकाश कुंटे, लेखिका अदिती मोघे, कलाकार दीप्ती लेले व प्रियदर्शन जाधव यांना निमंत्रित केले असून चित्रपट संपल्यावर,दुपारी ४:३० वाजता चित्रपटगृहाच्या आवारातच रसिक प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. यावर्षीचा राज्य शासनाचा बालकलाकार पुरस्कार मैथिलीला मिळाला असल्याने तिचे विशेष कौतुक केले जाणार आहे. यासाठी सर्व रसिकांनी आवर्जून यावे असे आवाहन रोटरी अध्यक्ष दीपक काळे, प्रतिमा अध्यक्ष सुधीर जोगळेकर व डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी संयुक्तपणे केले आहे.