डोंबिवलीत मनवसेचे अनोखे आंदोलन ; प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर खेळले मैदानी खेळ

(श्रीराम कांदु)

 डोंबिवली – पुन्हा एकदा महराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी अनोखे आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. मैदानात लग्नसोहळे पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी तेथील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी मनविसेकडे आल्यावर त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत अनेक वेळेला प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यावर पट्टीबांधून गप्प बसलेल्या प्रशासनाने मनविसेच्या पत्रांना पाठ दाखवली. मनविसेचे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जेधे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यलयातील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर मैदानी खेळ खेळले.

    रस्त्यावर खड्डे पडल्याने उलटे चालणे, पालिकेच्या कार्यालयासमोर गणपती आरती केली, प्रशासनाचे श्राद्ध घातले, विभागीय कार्यालयात उपायुक्त बसत नसल्याने खडी टाकली अश्या प्रकारची अनेक आंदोलने करून महराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीतील क्रीडा संकुलात लग्न सोहळे पार पडल्यावर दुसर्या दिवशी तेथेचे कचरा पडल्याने नागरीक हैराण झाले आहेत. मनविसेचे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जेधे यांच्याकडे यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावर त्यांनी पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र त्यावर पालिकेने फारसे लक्ष दिले नसल्याने अखेर सोमवारी अध्यक्ष सागर जेधे, सचिव प्रीतेश पाटील यासह सचिन कस्तूर , अमित बगाटे, कौस्तुभ फडके , सुहास काळे , गणेश नवले, अनिश निकम, स्वप्नील वाणी, क्षितीज माळवदकर , ज्ञानेश महाडिक, चिन्मय वारंगे , नंदादीप कांबळे , योगेश चौधरी, जयेश सकपाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मनविसेचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्याकार्यालयाबाहेर मैदानीखेळ खेळून आंदोलन केले. काही वेळानंतर साबळे यांनी त्याचे निवेदन घेऊन मैदानातील कचरा लवकरात लवकर उचलू असे आश्वासन दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email