डोंबिवलीत मंगळवारी पाणी पुरवठा 24 तास बंद

डोंबिवली दि.18 – डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या नेतीवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळ्यापूर्व दुरुस्ती असल्याने मंगळवार 19 जून रोजी पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. नेतीवली येथे डोंबिवलीला पाणी पुरवठा करणारे जल शुद्धीकरण केंद्र असून पावसाळा पूर्व देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या मंगळवार 19 जून रोजी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती उप कार्यकारी अभियंता अनिरुद्ध सराफ यांनी दिली. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा असेही आवाहन त्यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email