डोंबिवलीत भांडण सोडवणा-यावर हल्ला
डोंबिवली – भांडण सोडवणे एका तरुणाला चांगलेच अंगलट आले असून भांडण सोडवण्यास गेलेल्या या तरुणाला दोघा जणानी बेदम मारहाण केल्यःची घटना डोंबिवलीत घडली
डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगर मढवी बंगल्या नजीक राहणारे जितेश पेडणेकर काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास स्वामी नारायण मंदिराच्या मोकळ्या जागेत त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते .यावेळी काही वेळाने अनिल सदाशिव व प्रदीप जगताप त्या ठिकाणी आले .या दोघांमध्ये वाद सुरु झाला .यावेळी जितेश ने त्यांना भांडण करू नका असे सांगत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे संतापलेल्या या दोघांनी जितेशवर तलवारीने हल्ला केला तसेच शिवीगाळ केली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अनिल सदाशिव व प्रदीप जगताप विरोधात गुन्हा दखल केला आहे