डोंबिवलीत बालमजूरांकडून नालेसफाई…  ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी 

डोंबिवली,दि. १६- एकीकडे बालकामगारावर राज्य सरकारकडून बंदी असताना दुसरीकडे पालिका प्रशासनाकडूनच बालमजुरांना राबविल्याची वास्तविकता समोर आली आहे. पावसाळा सुरु झाल्याने शहरातील नालेसफाईचे काम जोरात  सुरु झाले आहे.मात्र डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात  बालमजूरांकडून नालेसफाई केली जात असल्याचे मनसेने उजेडात आणले. याप्रकरणी  संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार का ? असा प्रश्न डोंबिवलीरांकडून उपस्थित केला जात आहे.

   डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथील नालेसफाईचे काम सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाल कामगार ( प्रतिबंध व नियमन ) अधिनियम, १९८६ नुसार वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.विशेषतः १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई केली जाते.दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या, किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत र १०,००० ते र २०,०००/- दंड होऊ शकतो. शनिवारी डोंबिवली मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनीपालिकेच्या कामाची पाहणी केली असता त्यावेळी सदर ठिकाणी बालमजूर नालेसफाई करत असल्याचे निदर्शनात आले. घरत यांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. हे बालमजूर कसारा येथून आले असून यासंदर्भात घरत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारावरून बालमजुरीला अप्रत्यक्षपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे दिसते. याबाबत महापौर विनिता राणे यांना संपर्क केले असता त्या म्हणाल्या, नालेसफाईचे काम देताना बालमजुरांकडून काम करून घेण्यास बंदी असल्याचे नमूद केले जाते. असा प्रकार होत असेल तर त्याठेकेदारावर कारवाई केली जाईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email