डोंबिवलीत बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला
डोंबिवली दि.२० -डोंबिवली येथिल टाटा पॉवर परिसरात बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला आहे.आज सकाळी MH 17 T 2751 या ट्रकमधून दुर्गंधी येत होती त्यात गोमांंस असावे असा संशय आल्याने बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी सदर ट्रक अडवायचा प्रयत्न केला परंतु चालकाने ट्रक न थांबवता थेट पुढे नेला यावेळी या कार्यकर्त्यांंनी ट्रकचा पाठलाग करत कसाबसा हा ट्रक अडवला .हा ट्रक मांसाने भरलेला असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचे या कार्यकर्त्यांंना आढ़ळले.त्यांनी सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली.दरम्यान मानपाडा पोलीस या प्रकरणी तपास करत असून सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.दरम्यान ठाकुर्ली येथून ६ तर कल्याण येथून ४ गोवंश चोरीला गेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या त्यातच आज घडलेला प्रकार पहाता ग्रामास्थात आपल्या गुरां संदर्भात काळजीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी शहरात होत आहे.