डोंबिवलीत फरसाण दुकान जाळून खाक
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोड वरील समर्थ चौकातील गंगेश्वेर टॉवर मधील तळमजल्यावर असलेल्या माया फरसाणच्या दुकानास काल रात्री 11 च्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण जळून खाक झाले .सुदैवाने दुकान बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आगीमुळे वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.आग्नीशामन दल येईपर्यंत आगीने रूद्र स्वरूप धारण केले .आग्नीशामन दलाचे जयेश मोरे आणि तुकाराम पाटील यांच्यासह दोन बंबगड्या दाखल येवून हि आग काही वेळात विझवण्यात आली.रात्रीची वेळ असल्याने त्या मार्गावर रहदारी कमी होती.आग देवाच्या फोटोसमोर दिवा ठेवत होता व तो पडल्यामुळे लागली असा अंदाज वर्तविण्यात येत असून मानपाडा पोलीस आधिक तपास करीत आहेत.माया फरसाण दुकान राजू सरोज यांच्या मालकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Please follow and like us: