डोंबिवलीत प्रथमच आयुर्वेदिक  उपचारांची  माहिती देणारे प्रदर्शन 

( श्रीराम कंदु )
रुग्ण आयुर्वेद उपचार पद्धतीकडे वळले असून  या पद्धतीची  सर्व माहिती जनसामान्यांना मिळावी म्हणून   क-हाडे ब्राह्मण सेवा मंडळ व डोंबिवलीतील पहिले आयुर्वेदिक रुग्णालय आर्थोवेद हाँस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  टिळक नगर समाजमंदिर सभागृहात येथे `आयुर्प्रबोध`कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डोंबिवलीत प्रथमच आयुर्वेदावर माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले.तसेच मोफत आयुर्वेदिक तपासनीय व चिकित्सा करण्यात आली.    या  प्रदर्शनात मंगेश  देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना डॉ. ऋषीमुनींनी आयुर्वेदावर केलेल्या कामाची माहिती   सांगताना  आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. 
जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसाराची गरज असून आयुर्वेद औषधे स्वस्त झाली पाहिजेत. तसेच सरकारने या उपचार पद्धतीची जास्तीत जास्त प्रचार करण्याने पुढे आले पाहिजे असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. चिंतन सांगणी,डॉ. संकल्प घरत, डॉ. अमित डांगे, डॉ. ऋषिकेश नागवेकर, डॉ. सुनील ढवळे उपस्थित होते. विशेष म्हणजे डोंबिवलीतील आर्थोवेद हाँस्पिटलमध्ये दर  मंगळवारी ते शनिवारी दुपारी २ ते ४ वेळेत रुपये  १० रुपयात सात दिवसांचे औषध देतो.  जवळपास  फ्री ओपोडी बाह्य रुग्ण विभाग सुरु आहे.  डोंबिवलीत आयुष नावाचे वेगळे  मंत्रालय आहे. रिचर्ससाठी  दिला आहे.  आयुर्वेदिक  उपचार घेणारे  डोंबिवलीत अनेक  रुग्ण आहेत. अनेक नवीन वैद्य तयार होत आहे.  मात्र औषध   अधिक स्वस्त झाली  पाहिजे. रुग्ण आयुर्वेदाकडे  वळला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. डोंबिवलीत   आयुर्वेदाचे  माहिती देणारे  प्रदर्शन भरवले आहे.पूर्वीचे ऋषीमुनी यांनीकिती प्रभावीपणे मांडले आहे.  `आयुर्प्रबोध`कार्यक्रमात मोफत आयुवेर्दिक चिकित्सा शिबीर , अस्थीघनता चाचणी, केसांची संगणकद्वारे तपासणी, संगणकद्वारे नदी तपासणी करण्यात आली. तसेच व्याख्याने, रुग्णानुभव, आयुर्वेद ,पंचकर्मचलत चित्रफीत आणि चर्चासत्र , मोफत वैद्यकीय सल्ला , मोफत अग्नी आणि विदध चिकित्सा  करण्यात आल्या. यावेळी ऑर्थोवेदचे सर्व आयुर्वेदिक डॉक्टर्स , ज्येष्ठ अस्थिचिकित्सक, डॉ. जयंत गोखले , गोखले ऑर्थोपेडिकचे सर्व सर्जन , कॅन्सर तज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email