डोंबिवलीत पोलीस कर्मचा-या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

कल्याण- पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचा-याच्या मुलीचा एका पोलीस कर्मचा-याने दारूच्या नशेत विनयभंग केल्याची संतापजनक घटना मानपाडा परिसरात घडली आहे .या प्रकरणी पिडीत तरुणीने मानपाडा पोलीस स्थानकात सदर पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील विरोधात तक्रार दखल केली असुण या तक्रारी नुसार पोलिसांनी जितेंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे जितेंद्र पाटील हा कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे .
सदर पिडीत तरुणी हि डोंबिवली मानपाडा येथील पोलीस वसाहती मध्ये राहते तिचे वडील पोलीस कर्मचारी आहेत .तर कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेत कर्तव्यावर असणारा जितेंद्र पाटील या देखील याच परिसरात राहतो त्याची व या पिडीत मुलीची ओळख आहे . काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास याच ओळखीचा फायदा घेत सदर पिडीत तरुणी इमारतीच्या गचीवर पाईप गुंडाळत असतांना जितेंद्र मद्यदुंध अवस्थेत त्या ठीकांनी आला त्याने जबरदस्तीने पेन तिच्या हातात देवून हातावर मोबाईल नंबर लिहण्यास सांगितला त्यानंतर त्याने विविध कारणाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला .या प्रकरणी घाबरलेल्या पिडीत तरुणीने जितेंद्र पाटील विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानी जितेंद्र पाटील विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email