डोंबिवलीत नियमानुसार गतिरोधक नसल्याने अपघात प्रमाण वाढले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहन चालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गती रोधक अर्थात स्पीड ब्रेकर बसविले जात असले तरी या गती रोधकासाठी आखून दिलेले नियम पाळले जात नसल्यामुळे या गती रोधकावर होणा-याअपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच नियमाचे पालन करत गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. दरम्यान डोंबिवलीतील दिनद्याळ रोड आणि कोपर रोडवर बसविण्यात आलेल्या गतिरोधकाबद्दल पालिका प्रशासनाला वाहन चालकानी धन्यवाद देताना अशा प्रकारे शहरातील सर्व रस्त्यावर गतिरोधक बसवून अपघात कमी करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.
शहरातील हायवे सह गल्ली बोळातील रस्त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकाच्या इच्छेनुसार गती रोधक बसविले जात असून या गती रोधकावर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहन चालकांना गती रोधकाचा अंदाज न आल्याने अपघाताची संख्या कमालीची वाढली आहे. तसेच डोंगरा सारख्या उंच सुळक्याच्या गती रोधकावर वाहने आपटल्याने वाहन चालकांना पाठ दुखी, कंबरदुखी आणि मानदुखीचे आजार जडावले असून या नियमाचे उल्लंघन करून बसविल्या जाणा-या गतिरोधकाना आळा घालत गतीरोधकासाठी आखून दिलेले नियम पाळण्याची मागणी होत आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी रस्त्यावर राम्प्लर बसवून वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला देखील केराची टोपली दाखविण्यात आली असून ग्तीरोध्काचे नियम देखील प्रशासनाकडून सांगितले जात नसल्याची नगरसेवकाची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत नव्याने तयार करण्यात आलेल्या दीनदयाळ रोड आणि कोपर रोड या सिमेट कॉंक्रीटच्या रस्त्यावर स्थानिक नगरसेवकाच्या मागणीनुसार टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर वाहनचालकाच्या पसंतीस उतरले असून मागील ८ दिवसात सुमारे ५०० पेक्षा जास्त वाहन चालकांनी पालिका प्रशासनाला फेसबुक आणि व्हाटस अपच्या मध्यमातून धन्यवाद देत अशा प्रकारे गतिरोधक शहरातील सर्व रस्त्यावर बसवून वाहनचालकांना होणार्या त्रासातून नागरिकाची सुटका करण्याची मागणी केली आहे.या गतिरोधकामुळे अपघात वाढले असल्याचे डॉ आनंद हर्डीकर यांनी सांगितले
असे आहेत गतिरोधक
शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ३.६ मीटर म्हणजेच १२ ते १४ फुट रुंद असलेल्या या गती रोधकाची मधली उंची ६ ते ८ इंच इतकी आहे. मात्र दोन्ही बाजूने निमुळता असलेल्या या गतीरोधकाची उंची अधिक असली तरी त्याप्रमाणात रुंदी असल्यामुळे वाहने आपटत नाहीत मात्र वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहन चालकांना या गती रोधकामुळे कोणताही त्रास होत नाही.