डोंबिवलीत नऊ जुगारी गजाआड
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शिळ रोड पांडुरंग वाडी परिसरात जुगार सुरु असल्याची माहिती मानपाडा पोलीसाना मिळाली होती. या माहितीच्या आधारे या परिसरात गस्ती घालत असताना जुगार सुरु असून काही जण जुगार खेळत असल्याचे पोलीस कर्मचा-यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ नऊ जुगा-यांना ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. किसन चव्हाण, राजाराम भुसारे, बसप्पा साखरे, माणिक आशन, नागेश राठोड, विनोद राठोड, रमेश चव्हाण, रमेश ध चव्हाण, शंकर राठोड अशी अटक जुगार्यांची नावे असून ते सर्व पांडुरंग वाडी परिसरात राहणारे आहेत .
Please follow and like us: