डोंबिवलीत दुकलीने बँकेला घातला अडीच कोटींचा गंडा

डोंबिवली – बँकेकडे गहान ठेवलेल्या सदनीकांची परस्पर विक्री तसेच काही सदनिका इतर बँकेत गहाण ठेवत दुकलीने बँकेला कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत उजेडात आली आहे .या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात जगदीश वाघ व दत्तात्रय वाळगी विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
डोंबिवली एम आय डी सी परिसरात राहणारे जगदीश वाघ व दत्तात्रय वाळगी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड एनकेजीएसबी  बँकेला तब्बल अडीच कोटींचा गंडा घातला आहे . जगदीश वाघ व दत्तात्रय वाळगी यां दोघांनी सद्गुरू दीप प्लॉट नंबर 30 सर्वे नंबर २६४ ,चोळे येथील सेन्ट्रल रेल्वे मेन्स सोसायटी मधील रूम नंबर १०१ ,२०१,३०१,व ४०१ हि मिळकत दुस-या बँकेकडे गहाण ठेवत कर्ज घेतले असताना देखील एनकेजीएसबी बँकेकडून हि बाब लपवून ठेवत कर्ज घेतले तर एनकेजीएसबी बँकेकडे गहाण ठेवलेले नांदिवली रोड येथील गुरुकृपा दर्शन मधील रूम नंबर १०१ व १०२ हे परस्पर विक्री केले .त्यामुळे कर्ज मिळवण्याकरिता खोटे कागदपत्र बनवून तब्बल एनकेजीएसबी बँकेला अडीच कोटींचा गंडा घातला सदर बाब निदर्शनास येताच याबाबत एनकेजीएसबी बँक प्रशासनाने ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती त्यानंतर या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात जगदीश वाघ व दत्तात्रय वाळगी विरोधात तक्रार नोंद केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी जगदीश वाघ व दत्तात्रय वाळगी या दोघा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email