डोंबिवलीत तोतया पोलिसाने महिला दुकानदाराला लुबाडले

डोंबिवली – प्लास्टिक बंदी विरोधात सर्वत्र जोरदार कारवाई सुरु असून याचा फायदा भामट्यांनी घेण्यास सुरुवात केली असून कल्याण पूर्वेतील एका दुकानदाराला पोलीस असल्याची बतावणी करत प्लास्टिक पिशव्या बाळगल्या म्हणून धमक्या देत या महिलेकडून दागिने व रोकड उकळल्याची घटना उघडकीस आली होती अशीच एक घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे .डोंबिवली पूर्व माणपाडा रोड परिसरातील एका महिला दुकानदाराला प्लास्टिक पिशव्या वापरता अशी धमकी देत तिच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगलसूत्र घेवून पळ काढल्याची घटना घडली या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी या भामट्या विरोधात गुन्हा दखल करत त्याचा शोध सरू केला आहे

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड येथे शिवाजी उद्योग नगर येथे मिनी जनरल स्टोअर्स नावाने दुकानं आहे .काल रात्री सव्वा नवू वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम दुकानात आला त्याने दुध व शेवचे पाकीट मागितले तसेच पिशवी देण्यास सांगीतले .त्यामुळे या महिला दुकानदाराने त्याला दुकानात असलेली जुनी पिशवी दिली त्यानंतर या इसमाने आपण पोलीस असल्याचे सांगत पिशव्या तर बंद झाल्या मग तुम्ही कशा वापरता असे सांगत पिशव्या वापरल्या तर 17 हजार रुपये दंड आहे अशी धमकी देत दुकानाची झडती सुरु केली .अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सदर महिला घाबरली हि संधी साधत या भामट्याने तिला तुमचे मंगळसूत्र काढून मला द्या तुम्ही मानपाडा पोलीस स्थानकात या व दंड भरा व मंगळसूत्र घेवून जा असे सांगितले व तेथून निघून गेला .काही वेळाने सदर महिला मानपाडा पोलीस स्थानकात गेली असता तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email