डोंबिवली – डोंबिवली जवळील खोणी मानपाडा उंबरली रोड येथे राहणार जयेश पाटील ( २८ ) यांचा सात ते आठ महिन्यापूर्वी सुजित दातीलकर व त्याच्या मित्रांसोबत भांडण झाले होते .या भांडणाचा राग मनात धरून मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सुजित आणि त्याच्या तीन मित्रानी जयेशला उंबरली येथील साई धारा टॉवर परिसरात गाठले .सुजितने जयेश ला दगडाने मारून खाली पाडले व त्याच्या मित्रांनी जयेशला लाकडी दंडक्याने मारहाण केली याच दरम्यान सुजितने जयेश वर चाकूने हल्ला करत गळ्यावर ,डोळ्यावर पोटात चाकूने वार केले.या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले असून या प्रकरणी जयेशचे काका लालचंद पाटील यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी सुजित दातीलकर सह त्याच्या तीन मित्रा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.