डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात कश्मिरा गलक्सी मध्ये राहणारे दीपक विसपुते गुरुवारी सकाळी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने ,घड्याळ रोख रक्कम असा मिळून ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी दीपक यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: