डोंबिवलीत घरफोडी ;६८ हजारांचा मुद्देमाल लंपास
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील भोपरगाव देवी मंदिराजवळ राहणारे नारायण ढेहरक ३४ काल दुपारी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने काल रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी ढेहरक यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: