डोंबिवलीत खड्ड्यामुळे पडून जखमी आता पर्यंत ५ जणांचा मृत्यू तर ४ जखमी
(म.विजय)
डोंबिवली दि.१७ – येथील एमआयडीसी निवासी भागात राहणारे शिवसैनिक,माजी उपशाखाप्रमुख सुरेश साने (६० वर्षे) हे मोटारसायकलने कामावर जाताना कल्याण शीळ रोडवरील सूचक नाका येथे खड्ड्यामध्ये पडून डाव्या पायाला मार लागून ते जबर जखमी झाले.
त्यांचे नशीब बलवंत्तर त्यांचा मागून येणाऱ्या वाहनाने ब्रेक दाबल्याने त्यांचा जीव वाचला. त्याना एमआयडीसी मधील ठाकूर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांचा डाव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले आहे.
सुरेश साने हे बँक ऑफ बरोडा,उल्हासनगर शाखेत कामाला असून त्यांना निवृत्त होण्यास अवघे १५ दिवस बाकी होते. त्यांना यामुळे जबर मानसीक धक्का बसला आहे.
Please follow and like us: