डोंबिवलीत उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या चायनीज कॉर्नरवर कारवाईची मागणी 

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ह्द्द्दीत उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या चायनीज कॉर्नरवरवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कल्याण मध्ये एका चायनीज  कॉर्नरच्या मालकावर गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप अजूनही  चायनीज कॉर्नरच्या गाड्या सुरु आहेत. डोंबिवली स्टेशन परिसरात अनेक वर्षापासून उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या चायनीज कॉर्नर सुरु आहेत. कांही  चायनीज कॉर्नरच्या गाड्यावर बिनदास्तपने दारू पिली जाते. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती असूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे दिसते.  

   कल्याण पश्चिमकेडिल बेतूरकरपाडा परीसारतील प्राईड चायनीज येथे मानवी जीवितास धोका निर्माण होईल धोका निर्माण होईल तसेच ज्वालाग्रही शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करत खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवून मानवी जीवितास आरोग्यास अपायकारक होईल अशा पद्धतीने वीणापरवानगी विक्री करत असल्याचे आढळून आले .यामुळे बाजारपेठ पोलिसांनी चायनीज चे मालक अकिल बिश्वास विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .पोलिसांनी कारवाई सुरु केली असली तरी महापालिका प्रशासनाकडून मात्र अशा खाद्य पदार्थांच्या गाड्यावर कारवाई करिता हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email