डोंबिवलीत आयोजित केलेल्या बिर्याणी फेस्टीव्हलला खवय्यांची तोबा गर्दी

डोंबिवली – येथे पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिव्हलच आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात एकाच ठिकाणी तब्बल ४० प्रकारच्या बिर्याणीची चव चाखता येणार आहे. त्यामूळे डोंबिवलीकर नागरिकांनी पहिल्या दिवशी गर्दी केली.

राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले.

झमझम बिर्याणी, बांबू बिर्याणी, मटका बिर्याणी, सुरमई बिर्याणी, कोकोनट बिर्याणी, मेयोनिझ बिर्याणी ही नुसती नावं जरी ऐकली, तरी एखाद्या खवय्याच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता या सगळ्या बिर्याणी खाण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळालीय आणि याला निमित्त ठरलाय डोंबिवलीत पहिल्यांदाच भरलेला बिर्याणी फेस्टिव्हल.

डोंबिवलीच्या स. वा. जोशी शाळेच्या प्रांगणात शुक्रवारपासून या पहिल्या-वहिल्या बिर्याणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात २२ स्टॉल्स आहेत. ज्यात सहसा बघायला न मिळणाऱ्या अनेक वेगवेगळ्या बिर्याणीचाही समावेश आहे.

या महोत्सवात फक्त बिर्याणीच नव्हे, तर चिकन डिश , फिश डिश यांचे अनेक वेगवेगळे प्रकार दर्दी खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. शिवाय मॉकटेल्स आणि दिल्लीचं प्रसिद्ध ‘फायर’ पानही इथे उपलब्ध आहे. त्यामुळे  उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी संध्याकाळी या बिर्याणी फेस्टिव्हलला खवय्यांनी तोबा गर्दी केली. अशाप्रकारचा पहिलाच फेस्टिव्हल डोंबिवलीत होत असल्यानं खवय्यांनी आनंद व्यक्त केला. 

डोंबिवली ही सांस्कृतिक उपक्रमांसाठी ओळखली जाते. मात्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या या शहरात दर्दी खवय्यांची संख्याही मोठी असून त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण हा महोत्सव आयोजित केल्याचं आयोजक समीर चिटणीस यांनी सांगितलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email