डोंबिवलीतील स्मशानभूमीत काव्य संग्रहाच प्रकाशन करून शासनाचा निषेध

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – महाराष्ट्रभर जागो जागी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी  व मराठी भाषा जोपासण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप डोंबिवली येथील शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत मध्ये करण्यात आला.याठिकाणी  राज्यातील अनेक साहित्यिक उपस्थित होते. यावेळी जयप्रकाश घुमटकर यांनी ‘टवाळकी स्मशानाच्या दारात’ या काव्य संग्रहाच प्रकाशन केले. यावेळी  घुमटकर यांनी  शासनाच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले,  प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषांना संधी दिली जाते.तेथे  अनिवार्य केले जातात मात्र आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य का केली जात नाही.मुले  इंग्रही शाळेत शिकायला जातात म्हणून नावे ठेवतात. इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेच्या शाळेत एक भाषा मराठी भाषा अनिर्वार्य विषय करावी अशी शासनाला विनंती करीत आहोत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email