डोंबिवलीतील शिवमार्केट प्रभागात ११  तास विजपुरवठा खंडीत

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – गटाराचे खोदकाम करताना उच्च विज दाब असलेले केबल तुटल्याने डोंबिवली पूर्वेकडील शिवमार्केट परिसरात सुमारे ११ तास वीज पुरवठा खंडीत झाला होता.रामनगर प्रभागात कस्तुरी प्लाझा रामनगर चिपलूणकर रोडडॉ. राव बंगलो शिवमार्केट प्रभागात मानपाडारोड येथील शिवमार्केट ते टाटालाईन परिसरमॉडन प्राईड हॉटेल ते  स्टेट बँक पर्यंत संपूर्ण परिसरातील बत्ती गुल झाली होती. एन उन्हाळ्यात वीज गेल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. रात्री साडे आठ वाजता वीज पुरवठा पुरवत करण्यात आला.

     वीज पुरवठा खंडित झाल्यावर येथील स्थानिक नागरिक राजन गाला यांनी  महावितरणचे अभीयंता हर्षल म्हात्रे यांना संपर्क  केला. म्हात्रे  सदर ठिकाणी आले असता  त्यांनी फूटलेल्या कॅबलच्या शेजारी असलेले केबल जोडून शिवमार्केट प्रभागात विजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश संबंधीत कर्मचा-यांना दिले. दुपारी दीड वाजता केबल जोडून झाल्यावर त्यांनी ट्रायलघेतली मात्र वीज पुरवठा पूर्वरत झाला नाही. दुपारी  दोन  वाजता म्हात्रे यांनी  दोन्ही कॅबल कट करून तिथे जोडण्याचा करण्याचा निर्णय घेतला. रात्री साडे आठ वाजता केबल जोडणीचे काम पूर्ण झाले. यापूर्वी याच जागेवरील दोन वेळेला कट झाले होते. ८ एप्रिल २०१५ रोजी रात्री ११ वाजता रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे  खोदकाम करताना पोकलेन मशीनने दोन्ही कॅबल कट झाले होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी दुपारी साडे चार वाजता देखील वीज पुरवठा पुर्ववत झाला. ११ जानेवारी २०१६ रोजी रात्री साडे अकरा वाजता  पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना ब्रॅकर मशीनने दोन्ही कॅबल कट झाले होते. त्यावेळी  दुसऱ्या दिवशी  दुपारी साडे बारा वाजता वीज पुरवठा पुर्ववत झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email