डोंबिवलीतील व्यवासायिकाला मारहाण ,कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी बोगदा असुरक्षित
बोगद्याच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
डोंबिवली – गेल्या महिन्यात कोळशेवाडी बोगद्यामध्ये रात्रीच्या सुमरास विनोद सुर्वे या तरुणाची चोरीच्या उद्देशाने निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती .या बोगद्यात सातत्याने होणाया लुट पाट व मारहाणीच्या घटनामुळे या या बोगद्यातून मार्गक्रमण कारणा-या नागरिकांच्या सुरक्षित तेचा प्रश्न ऐरणीवर आला होता या बोगद्यात पोलिसाची गस्त वाढवण्याची मागणी केली जात होती त्यातच पुन्हा या बोगद्यात एका व्यवसायिकाला चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत लुबाडल्याची घटना घडली त्यामुळे या बोगद्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात आशा परडाईज इमारती मध्ये हरिशंकर पांडे ( ५२ ) हे व्यावसायिक राहतात .काल रात्री पावणे अकराच्या सुमारास आपल्या दुचाकीने कोळशेवाडी रेल्वे बोगद्या नजीक असलेल्या शितलामाता मंदिराहुन बोगद्याच्या दिशेने जात होते .बोगद्या नजीक पोहचताच एका अज्ञात इसमाने त्यांना हातवारे करून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पांडे यांनी न थांबता दुचाकी पुढे नेली .मात्र पुढे खड्डा असल्याने पांडे यांनी दुचाकी हळू केली याच संधीचा फायदा घेत या अज्ञात इसमाने पांडे यांनी दुचाकी पकडली व समोरून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमांनी पांडे याना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील बॅग मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला .या प्रकरणी त्यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसानी मारहाण करत लुटपाट करणाऱ्या चार ते पाच इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान या बोगद्यात पोलीस गस्त नसल्याने चोरट्याचा उपद्रव वाढला आहे .गत महिन्यात चोरट्यांच्या हल्ल्यात विनोद सुर्वे या तरुनाला आपला जीव गमवावा लागला त्यानंतर पोलीस यंत्रणेने काही दिवस गस्तीचा देखावा केला मात्र पुन्हा एकदा पोलीसांची उदासीनता समोर आली असल्याने चोरट्यांचा उपद्रव या ठीकांणी वाढला आहे .