डोंबिवलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
पोलीस आणि लाल बावटा रिक्षा युनियनने केले कौतुक
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – प्रवासादरम्यान रिक्षात आपली बॅग विसरून गेलेल्या प्रवाशांना त्याची बॅग परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा लाल बावटा रिक्षा चालक – मालक संघटना आणि टिळकनगर पोलीसांनी कौतुक केले. कोल्हापूर येथून आपल्या कुटुंबासह डोंबिवलीत आलेले त्या प्रवाशी पूर्वेकडील फडके रोडवरून रिक्षात शेलार नाका येथे उतरले. मात्र रिक्षात बॅग विसरल्याने त्यांनी संघटनेच्या कार्यालयात गेले. त्यावेळी सदर रिक्षाचालकाची माहिती मिळाली. रिक्षाचालकाने सदर बॅग घेऊन कार्यालयात आणून दिली. बॅगेत काही कपडे आणि अर्धा ग्रॅमचे १३ मणी होते.
कोल्हापूर येथून बाळू दत्तू रासने हे पत्नी आणि दोन मुलांसह डोंबिवलीला स्टेशनला आले. फडके रोडवरून त्यांनी एमएच०५ –झेड २३९६ या क्रमाकांच्या रिक्षात बसले. तेथून शेलार नाका येथे उतरल्यावर काही वेळाने त्यांच्या लक्षात आले कि आपली बँग रिक्षात विसरलो. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात रिक्षाचा शोध घेतला. मात्र कुठेही रिक्षा दिसत नसल्याने बाळू यांनी चौकशी केली असता काही नागरिकांनी त्यांना लाल बावटा रिक्षा चालक – मालक संघटनेच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. बाळू त्यांनी संघटनेच्या कार्यालयात गेल्यावर रिक्षाचालकाचे वर्णन केले. या माहितीच्या आधारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकाला कार्यालयात बोलावले. गोळीवली येथील राहणारा रामसमोज यादव ( ५८ ) या रिक्षाचालकाने ही बँग जपून ठेवली होती. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले. बाळू रासने यांनीही रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपानाबद्दल त्यांचे खूप आभार मानले.
रामसमोज यादव यांचा प्रमाणिकपणा
१० वर्षांपूर्वी दिल्लीतून आलेला एका प्रवाशी रिक्षाचालक रामसमोज यादव यांच्या रिक्षात ठाकुर्लीला जाण्यासाठी बसला. महत्वाची कागदपत्रे असलेली त्याची बँग रिक्षात विसरला होता. त्याची बँग यादव यांनी परत केलीहोती. तसेच डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथीळ येथील प्रवाशाचीहि बँग यादव यांनी परत केली होती. तीन प्रवाशाचे मोबाईल परत करणाऱ्या या प्रवाशांनाहि त्यांचे आभार मानले होते.