डोंबिवलीतील पादचारी पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस शेड लागणार,

स्थायी समिती सदस्य विकास म्हात्रे यांच्या प्रयत्नाला यश
(श्रीराम कांदु )
   डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वे पादचारी पुलाच्या एक दिशेला पालिकेने शेड टाकले नसल्याने या सापत्न वागणूकीबाबत नागरिक नाराज झाले आहेत. स्थायी समितीच्या सभेत सदस्य विकास म्हात्रे यांनी  या संदर्भात पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्या पूर्वी या अर्धवट शेड टाकलेल्या ब्रिजच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची हमी स्थायी समितीच्या सभेत म्हात्रे यांना दिल्याने येत्या काही महिन्यात उर्वरित ब्रिजवर शेड टाकण्याचा मार्ग निकाली निघणार आहे.
     डोंबिवली पश्चिमे कडील विष्णू नगर व महात्मा फुले रोड च्या दिशेला असणाऱ्या स्काय वोक च्या ब्रिजवर शेड टाकण्याचे काम अर्धवट  स्थितीत सोडण्यात आले होते एक वर्ष होत आले ब्रिज वर शेड  टाकन्याचे काम सुरू न केल्याने या गंभीर प्रश्नी स्थायी समिती सदस्य विकास म्हात्रे यांनी या विषया कडे प्रशासनाचे लक्ष विधी पश्चिमे कडील नागरिकांना सापत्न वागणूक देत असल्याचा जाब विचारला अखेर प्रशासनाने पावसाळ्या पूर्वी या अर्धवट शेड टाकलेल्या ब्रिजच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची हमी स्थायी समितीच्या सभेत म्हात्रे यांना दिल्याने येत्या काही महिन्यात उर्वरित ब्रिज वर शेड टाकण्याचा मार्ग निकाली निघणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेनेला असलेल्या बाजूस स्कायवॉक उभारून १२ वर्षाचा कालावधी लोटला आहे .या पूलावर पूव्रेच्या बाजूने महापालिकेने तीन कोटी रुपये खर्च करुन शीट टाकली असून काही विकास काम झालेले आहे.  मात्र डोंबिवली पश्चिमेच्या दिशेने या पूलावर कोणत्याच सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. पूलाच्या पायर्या हि मच्छी मार्केटच्या दिशेने तुटलेल्या आहेत. पूलावर कचर्याचे सम्राज्य असून रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधारात त्या पूलावर गर्दुल्ले ,वारंगणाचा वावर वाढला आहे  . त्यामुळे महिलांसाठी हा पूल असुरक्षित झाला आहे. या पुलापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विष्णूनगर पोलिसांचे दुर्लक्ष आहे. याबाबत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजप सदस्य विकास म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत रेल्वे सुरक्षा बलाकडून फेरीवाल्यांवर जशी कारवाई केली जात आहे. त्याप्रमाणो वारांगणांना पिटाळून लावण्याची कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. पूलाचे काम केव्हा कधी व किती वेळेत करणार असा प्रश्न विचारला. त्यावर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी पूलावर पश्चिेमेच्या बाजूला छत टाकणो,दिवे लावणो, पाय:यांची दुरुस्ती करणो हा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूरीसाठी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे पाठविला होता. आयुक्तांनी त्याविषयी काही खुलासा मागितल्याने त्याना खुलासा करुन हे काम केले जाईल. पूलाचे काम पावसाळ्य़ापूर्वी केले जाईल अशी हमी कुलकर्णी यांनी सभेला दिली आहे. म्हात्रे यांच्या मते पश्चिमेला मच्छीमार्केटकडे पूलाच्या पाय:या उतरतात. मच्छीमार्केट ते एव्हरेस्ट सोसायटीर्पयत हा पूल बांधला जाणार होणार. त्याचे विस्तारीकरण गेल्या दहा वर्षापासून रखडले आहे. हाच पूल पुढे मुंबईच्या दिशेने असलेल्या स्कायवॉकला जोडला गेल्यास प्रवाशांसाठी सोयीचा होईल. याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान दोनच दिवसापूर्वी पूलावर दिवे नसल्याने गैर प्रकार होत असल्याचा मुद्दा सोशल मिडीयावर झळकला होता. त्याची दखल घेत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी तातडीने पाहणी केली होती. त्या पश्चात  पुन्हा स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email