डोंबिवलीतील धक्कादायक घटना,लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ
लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेच छळ करणारा नराधमासह त्याला मदत करणारा बाप हि गजाआड
डोंबिवली – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत प्रेमाच्या ओढत शारीरिक सबंध ठेवले त्यांनंतर तिचा गर्भपात केला नराधम इथेच थांबला नाही त्यानंतर च्या सम्बधातून पुन्हा गर्भवती राहिली यावेळी त्याने गर्भ ठेवण्यास सांगितले मात्र पुन्हा सात महिन्यांनी या नराधमाने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेत सात महिन्यांचा गर्भपात केला व लग्नास नकार देत पिडीतेला शिवीगाळ व मारहाण केली .या प्रकरणी पिडित तरुणीने माणपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानी नराधम नंदू मुठे ,त्याचे वडील पंढरीनाथ मुठे,आई नंदिनी मुठे या तिघा विरोधात गुन्हा दखल करत नंदू व त्याचे वडील पंढरीनाथ या दोघाना अटक केली आहे
डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव परिसरात नराधम नंदू मुठे राहतो तर डोंबिवली पश्चिमेकडील परिसारत सदर पिडीत तरुणी राहते. नंदू ने सदर पिडीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले याच दरम्यान हि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने गोळ्या देवून नंदू ने तिचा गर्भपात केला त्यानंतर पुन्हा तिच्याशी सबंध ठेवले त्यामुळे हि मुलगी पुन्हा गर्भवती राहिली मात्र नंदू मठे याने लग्न करतो असे सांगत तिला गर्भ वाढवण्यास सांगितले .मात्र सदर पिडीत मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्याने मुलीने लग्नासाठी तगादा लावल्याने नंदू मुठे ,त्याचे वडील पंढरीनाथ मुठे ,आई नंदिनी मुठे यांनी तिला जबरदसतीने टीटवाळा येथील एका रुग्णालयात नेवून सात महिन्याचा गर्भपात केला तसेच या नंदू व त्याच्या वडिलांनी या गर्भाची विल्हेवाट लावली .त्यानंतर या पिडीत मुलीने लग्नासाठी तगादा लावल्याने संतापेल्या नंदू त्याचे वडील पंढरीनाथ यांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या पिडीतेने मानपाडा पोलीस स्थानकात गाठत आपली तक्रार नोंदवली असता पोलिसनी तत्काळ नंदू मुठे ,त्याचे वडील पंढरीनाथ मुठे,आई नंदिनी मुठे या तिघा विरोधात गुन्हा दखल करत नंदू व त्याचे वडील पंढरीनाथ या दोघाना अटक केली आहे.
Please follow and like us: