डोंबिवलीतील आदिशक्ती ढोल पथकातील दीपाली ढोमसेची आठ दिवसापासून मृत्यूशी झुंज,उपचारासाठी मदतीचे आवाहन

आठ दिवसापासून मृत्यूशी झुंज,उपचारासाठी मदतीचे आवाहन

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – डोंबिवली नवापाडा येथील आदिशक्ती महिला ढोल पथकातील 17 वर्षांची दीपाली ढोमसे नोकरीसाठी मुलाखत देऊन घरी येत असताना दिवा कोपर रेल्वे स्थानकाचे दरम्यान संध्याकाळी ट्रेनमधून पडल्याने गंभीर जखमी झाली ही घटना 15 ता घडली तिची घरची परिस्थिती अत्यन्त खराब असून पुढील उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन तिच्या मैत्रिणींनी केले आहे.
दीपालीने नुकतीच 10 वि ची परीक्षा दिली व आईला मदत करण्यासाठी ती नोकरी करण्याच्या हेतूने एका औषध कम्पनीत गेली होती परत येताना हा अपघात झाला गेले आठ दिवस तिच्या आईने उपचाराचा खर्च केला पण त्या घरकाम करत असल्याने व दुसरे कोणी कमावणारे नसल्याने त्यांनी आता तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन सोशल मीडियावर केले असून जमेल त्या पद्धतीने मदतीचे आवाहन केले आहे दिपालेच्या मेंदूला जबर मार लागला असून ती मृत्यूशी झुंज देत आहे असे ढोल पथकाच्याया प्राजक्ता देशपांडे हिने सांगितले .

मदतीसाठी 9833118716 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email