डोंबिवलीतील आंतर राष्ट्रीय तरण तलाव आज पासून पुनः सुरू

डोंबिवली – शालेय विद्यार्थ्याच्या परीक्षा संपत असतानाच 1 एप्रिल पासूनअचानक क्रीडा संकुलातील आंतर राष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव दुरुस्तीचे कारण देत बंद करण्यात आला होता त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने आज पासून तलाव पुनः सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यानी सुटकेचा श्वास सोडला
शालेय परीक्षा संपत असतानाच दुरुस्तीचे कारण देत अचानक 1 एप्रिल पासून तलाव बंद करण्यात आला होता या बद्दल पालक ,विद्यार्त्यांनी नाराजी दर्शवली होती मात्र प्रशासनाने 15 दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले होते.त्या प्रमाणे
तलाव दुरुस्तीसाठी बंद ठेवणार याची कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती या बद्दल पालकांनी व सभासदांनी संताप व्यक्त केला सुट्टीसाठी विद्यार्थ्याची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने या पूर्वीच दुरुस्ती करून घेणे गरजेचे होते अशी संतापजनक भावना विद्यार्थ्यानी व्यक्त केली होती
काही कर्मचाऱयांनी मात्र पाणी खराब झाले असूनतलावातील टाईल्स तुटल्या असल्याने 15 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्या प्रमाणे तलावातील खराब पाणी बदलण्यात आले असून काही किरकोळ दुरुस्तीही करून तलाव आज पुनः खुला करण्यात आला असे सांगण्यात आले महापालिका आयुक्त गोविद बोडके यांनी आज अधिका-यांसोबत तरण तलावाची पहाणी केली.
Please follow and like us: