डोंबिवलीतही मुलींची बाजी श्रुतिका महाजन आणि  ऋद्धी करकरेला १०० टक्के गुण 

श्रुतिका महाजन
ऋद्धी करकरे 

(श्रीराम कांदु)

डोंबिवली- राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९३.४  टक्के निकाल तर मुलांचा निकाल ९०.५५ टक्के लागला असून एकूण निकाल ९१.७३  टक्के लागला आहे. कल्याण डोंबिवलीतील २३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून या बहुसंख्य शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. येथील पाटकर शाळेतील श्रुतिका महाजन आणि टिळकनगर शाळेतील ऋद्धी करकरे  या दोन्ही विध्यार्थिनीनां शंभर टक्के गुण मिळाले आहे.

       कल्याण डोंबिवलीतील एकूण २२३ शाळामधून १०,३८० मुलगे तर ९,४४९  मुली असे एकूण १९,८२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९,३९९ मुलगे तर ८,७९१ मुली असे एकूण १८,१९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण विभागातील ३६ शाळांतील १,४८१ मुलगे व १,२२४ मुली असे एकूण २,७०५ त्यापैकी १३१०  मुलगे तर ११२१  मुली असे एकूण २३३१  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीतील २३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये स्वामी विवेकानंद, अरुणोदय, विष्णूनगर, आर.जी. सामंत, सिस्टर निवेदिता, न्यु ईरा, बालक मंदिर, वेलंकिनी, एस.के. पाटील, होळी क्रॉस शाळा इत्यादी शाळांचा समावेश आहे.

       

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email