डोंबिवलीजवळील संदप गावात `एक गाव एक गणपती`

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२३ – डोंबिवली शहरापासून जवळच संदप गावाने अजुनही आपले ग्रामीण सौंदर्य जपून ठेवले आहे. तंटामुक्त गाव म्हणून संदप गावाने सन्मान मिळवलेला आहे. त्याचबरोबर गेली ५३ वर्ष `एक गाव एक गणपती` या नियमानुसार गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गावच्या दत्तमंदिरात गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.

१९५६ साली संदप गावात काही घरात गणपती येत असत. त्यावेळी गावची वस्ती फारशी नव्हती. घरे देखिल कमी होती.११ घरांमध्ये गणपती येत असे गणपती आणण्यासाठी त्यावेळेस ३०० रुपये खर्च येत असे त्यावेळी हा खर्च फार वाटे. त्यामुळे सणावाराला होणारा खर्च टाळून एकच गणपती आणण्याचीकल्पना ग्रामस्थांना सुचली. त्याप्रमाणे १९५६ पासून गावच्या छोट्याशा मंदिरात दरवर्षी एकच गणेशोत्सव साजरा होऊ लागला.

असे ग्रामस्थ प्रविण पाटिल यांनी सांगतात. संदप गावाने अजुनही आपले गावपण जपले आहे. नागरिकरणाचा व काँक्रिटच्या जंगलाचा स्पर्श होऊ दिलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवात आरती झाल्यानंतर हरिपाठ, किर्तन ,भजन यांना प्राधान्य दिले जाते. गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देवळाच्या प्रांगणात पार पडतात. ज्या घरात गणपती असत त्यांच्याकडून नाममात्र वर्गणी घेतली जाते.

मानपाडा येथील मूर्तीकार एकनाथ पाटील हे दरवर्षी मोफत श्रीची मूर्ती देत असल्याचे संजू पाटील यांनी सांगितले. गावात सव्वाशे घरे आहेत. गावात अजुनही शेती केली जाते. भाताचे पिक घेतले जाते. आंबा, जांभूल यांची झाडे आहेत. गावात छोटासा रस्ता असून, रस्त्याच्या दोन्हीं बाजूस झाडे आहेत. टुमदार कौलारु घरे टिकून आहेत. वनश्रीने नटलेला परिसर संदपच्या सौंदर्यात भर घालत असल्याचे पाटील सांगतात. विसर्जनाच्या पुर्वसंध्येला सर्व माहेरवाशीनी, नातेवाईक संदप गावात गणेशोत्सवासाठी येतात. गावाच्या सीमेवरील खदाणीत गणपतीचे वाजतगाजत विसर्जन होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email