डोंबिवलीजवळील लोढा हेवन परिसरात १२ तास बत्ती गुल

डोंबिवली – डोंबिवलीजवळील लोढा हेवन परिसरात महावितरणच्या धिम्या कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसात रात्री वीज गुल होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि वीज बिलांची शंभर टक्के वसुली केल्या जाणाऱ्या लोढा हेवनमध्ये १२ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील रहिवासी प्रचंड संतापले होते. या प्रकारचा जाब विचारण्यासाठी येथील काही नागरिक पूर्वेकडील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता त्यांना एकही अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांनी महावितरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केला.
नवीन केबल टाकण्यासाठी महावितरण कंपनीने शनिवारी रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित केला होता. मात्र एेेन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिकांचे खूपच हाल झाले. रात्रभर वीज न आल्याने अखेर सकाळी नागरिकांनी डोंबिवली पूर्वेकडील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र याठिकाणी उत्तरे देण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने रहिवाशी प्रचंड संतापले होते. यावेळी रहिवाशी रमेश मोरे म्हणाले , काही ठिकाणी केबल खराब आहे तर काही ठिकाणी फिडर यामुळे दुरुस्तीचे काम चालू आहे. मात्र दुरूस्तीसाठी मेंटेनन्सची कामे केली जात नाहीत. त्यामुळे एखादा फॉल्ट झाल्यास तो दुरुस्त करण्यात संपूर्ण दिवस घालवला जातो. वीजपुरवठाबाबत विद्युत अधिका-यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतायेत. अखेर इथले नगरसेवक प्रभाकर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश मोरे, किरण सावंत, विठ्ठल शिंदे, तुषार जाधव हे महावितरणच्या कार्यालयात चौकशी गेले तर तिथले सर्व अधिकारी सुट्टीवर गेल्याचं सांगितलं.
डोंंबिवलीतही बत्ती गुल
लोढा हेवन पाठोपाठ काल अचानक आलेल्या मोसमीपूर्व पावसामुळे गणेश मंदिर जवळील मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने रात्री 9-30 ते मध्यरात्री 12 पर्यंत वीज पुरवठा काही भागात खंडित झाला होता उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना वीज नसल्याने बराच त्रास सहन करावा लागला अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कळकोटी यांना विचारले असता त्यांनी मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला असून कर्मचारी तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत रात्री उशिरा पर्यंत वीज नसल्याने अनेक भागात पाणी पुरवठाही होऊ शकला नाही
Please follow and like us: