डोंबिवलीजवळील पिसवली गावात  चिमुकलीचा कारच्या धडकेत मृत्यू 

डोंबिवली- पिसवली परिसरात राहणाऱ्या एका ३ वर्षीय चिमुकलीचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रीती रमेश ठाकूर आसे या चिमुकलीचे नाव आहे.  डोंबिवली पूर्वेकडील काल्याण शिळ रोड पिसवली परिसरात रमेश ठाकूर आपल्या पत्नी व  ३ वर्षीय मुलगी प्रीती  सोबत राहत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्रीती घरासमोर खेळत असताना भरधाव कारच्या धडकेने प्रीतीचा चिरडून मृत्यू झाला आहे. या बाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email