डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत” डिजिटल संकल्पनेसह ७ वर्षाचा चिमुरडा ठरला आकर्षणाचा केंद्र बिंदु

डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली  – श्री गणे मंदिर संस्थान व नववर्ष स्वागतयात्र संयोजन समिती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्रा ‘माझी अपेक्षा माझी कर्तव्ये आणि डिजीटल इंडिया ’ या थीमवर आधारित चित्ररथ आणि यंदाच्या स्वागत यात्रेत योगसना करणारा ७  वर्षाच्या वरद जोशी हा आकर्षनाचा केंद्र बिंदु ठरला. बुलढाणा येथील देऊळराजा गावत राहणारा वरद हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दूसरी शिकतो.  तो तीन तासात योगाची १८ प्रत्याक्षिके केली. त्यात ८  मिनिटाचे एक प्रात्यक्षिक असून त्यामध्ये २० ते २५  आसने  केली. 
सकाळी सहा वाजता  नववर्ष स्वागतयात्रेचा प्रारंभ भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम येथून सुरुवात झाली. त्यानंतर  महात्मा फुले रोड, घनश्याम गुप्ते रोड, सम्राट चौक, दीनदयाल रोड, स्टेशन परिसर, ओव्हर ब्रीज, आई बंगला, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड यामार्गी येवून यात्रेचा समारोप आप्पा दातार चौकात झाला. यंदाचे स्वागतयात्रेचे २०  वे वर्ष असून या स्वागत यात्रेत विविध सामाजिक विषयांवर तयार केलेले चित्ररथ,ढोल-ताशे पथके, पारंपारिक वेशभूषेतिल आबालवृद्ध,दुचाकीवर स्वार असणाऱ्या महिला-तरुणीचे पथक,मल्लखांब, तलवार, दांडपट्टा यांचे होणार चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझिम पथक,हे सर्व पाहण्यासारखे होते.  योगसना करणारा ७  वर्षाच्या वरद जोशी हा मुलगा आकर्षनाचा केंद्र बिंदु ठरला आहे. मराठवाड़ा-विदर्भ रहीवशी सेवा संघ यांच्या तर्फे वरदचे योगाची प्रतेक्षिका आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा येथील देऊळराजा गावत राहणारा वरद हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दूसरी शिकतो.  तो तीन तासात योगाची १८ प्रत्याक्षिके केली. त्यात ८  मिनिटाचे एक प्रात्यक्षिक असून त्यामध्ये २० ते २५  आसने  केली. वरदचे वडील संतोष जोशी यांचे म्हणणे आहे की, त्याने अवघ्या २  वर्षात आतापर्यन्त त्याने ३००  शिबिर घेवून तीन लाख विद्यार्थी वर्गाला योगाचे धडे दिले आहे. एकीकडे केंद्रसरकार आणि पंतप्रधान योग दिवस आणि योगाचा गाजावाजा करताना दिसते परंतु ७ वर्षाच्या वरदच्या मेहनतीची शासनाने किंवा सरकारने कुठलीही दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
संस्कार भारती तर्फे डोंबिवलीच्या फडके रोडवर नवर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या कलात्मक रंगोळ्या काढण्यात आल्या होत्या.  डोंबिवली सायकल क्लब  गेल्या ५  वर्षां पासून डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होते. सायकल चालवा आणि निसर्ग वाचवून आरोग्य वाढवा हा उदिष्ठ ठेवून या सायकल रैली काढण्यात आली. यंदा पहिले सायकल मित्र सम्मेलन डोंबिवलीत पार पडल्याने नागरिकांचा उतस्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे संस्थापक डॉ सुनील पुणतांबेकर यांनी दिली. डोंबिवली स्वागत यात्रेदरम्यान  वरदचे आसन बघण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती. या शोभे यात्रेला रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे , आमदार सुभाष भोईर, नगरसेवक दिपेश म्हात्रे  यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी  शोभा यात्रेत सहभाग घेतला. आधार इंडिया य सामाजिक संस्थेच्या वतीने अमित म्हात्रे आणि त्याच्या सहकार्यांनी नागरिकांना सरकारी योजनांची माहिती दिली. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र कोकण प्रांत डोंबिवली शहर शाखेच्यावतीने रस्ता मुक्त , फेरीवाला मुक्त असा फलक घेऊन सहकारी सहभागी झाले होते. मोबाईल मुक्त केंद्र डोंबिवलीच्या वतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या चित्ररथात लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा असा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचे स्वागत करताना उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्टेशनपरिसरातील फेरीवाल्यांकडून समान खरेदी करू नका, डोंबिवलीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन केले. डेंटल असोसिएशन डोंबिवलीच्या वतीने सुंदर दात आरोग्याची साथ असा संदेश देण्यात आला. जीवनविद्या मिशनच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत पर्यावरण हाच नारायण असा  संदेश देण्यात आला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email