डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची व लोकबिरादरी प्रकल्पाची  माहिती असलेल्या मानवंदना विशेषांकाचे प्रकाशन

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याविषयी व लोकबिरादरी प्रकल्प विषयक माहिती असलेल्या ‘ मानवंदना ‘ विशेषांकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षरमंच प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या अंकात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माहिती सोबत जायन्ट्स ग्रुप ऑफ कल्याण, कल्याण मिडटाउन, कल्याण मेट्रो, जायन्ट्स गृप ऑफ उल्हासनगर व भिवंडी यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या प्रसंगी स्पेशल कमिटी मेंबर मनोहर पालन, वन सी प्रेसिडेंट जयानंद केणी , वाइस प्रेसिडेंट सुनिल चव्हाण,विशेषांक संपादक योगेश जोशी, किशोर देसाईं, हेमंत नेहेते यांच्या हस्ते लोकबिरादरी प्रकल्पासाठी रुपये २५००० देणगी देण्यात आली. जायन्ट्स व अक्षरमंच प्रकाशनाचे वतीने लोकबिरादरीतील शाळेसाठी रुपये १५००० किमतीची पुस्तके आशिष खंडेलवाल ,योगेंद्र डोळस ,डॉ प्रकाश माळी, शंकर परब,ॲड यतीन गुजराथी , प्रमोद जोशी, भालचंद्र घाटे, आरती मुळे,डिंपल दहिफुले  यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email