डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाळ दगावले
डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाळ दगावले……
श्रीराम कांदू
रुक्मिणीबाई रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे. या महापालिकेच्या रुग्णालयात “फिजिशीयन” नसल्याने रुग्णाना ठाण्या मुंबईला पाठवले जात असल्याचे समोर आले असताना आता सकाळी पाच ते सात वाजे पर्यत एका गरोदर महिलेला डॉक्टर उपलब्ध नसल्याने आपले जन्माला येणारे बाळ गमवावे लागले आहे. सात वर्षा नंतर वंशाला दिवा पेटला होता पण रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बेजबाबदारपणा मुळे हा वंशाचा दिवा विझला आहे हेच या घटनेने समोर आले आहे.
शुक्रवारच्या महासभेत सताधारी शिवसेना व भाजपा एकमेकांना भिडले. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर हे लोक प्रतिनिधी भिडताना दिसून येत नाहीत. पण शिवसेना भाजपाचा राजकीय वाद या पक्षांनी महासभेत काढला. सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीच्या वेळेस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे आश्वासन दिले होते, पण सुपरस्पेशालिटी नाही, पण डॉक्टर देखील सताधारी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. या महापालिका रुग्णालयाचा वास्तव्यातील कारभार हा भोंगळ असून लोक प्रतिनिधी देखील या बाबत आवाज उठविताना दिसून येत नाहीत.
शुक्रवारी सकाळी वर्षा ढगे ही टिटवाळ्यातील कमलाकर जाधव चाळीत राहणारी महिला प्रसूतीच्या वेदना होत असल्याने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुगणालयात दाखल झाली. सकाळी पाच वाजता दाखल झालेल्या या महिलेच्या उपचारा साठी दुपारी बारा वाजे पर्यत कोणीही डॉक्टर उपलब्ध नव्हते.
“गायनोलॉजिस्ट” डॉक्टर आले पण दुपारी बारा वाजे नंतर. पण वेळ निघून गेल्याने जग बघण्याच्या आधीत या बाळाने जगाचा निरोप घेतला.
या वर्षा रवींद्र ढगे या महिलेला रुक्मिणीबाईत आणल्या वर तिला रक्तश्राव होत होता. बाळाचे पाय टोचत असल्याचे ती नर्सेसला सांगत होती पण डॉक्टरच उपलब्ध नसल्याने उपचार करणार कोण हा प्रश्न होता. येथील नर्सेसनी प्रथमोपचार केले पण हे उपाचार कमी पडले आणि प्रसूती नंतर काही वेळातच बाळ दगावले.
वर्षा ढगे या पीडित महिलेचा पती पोलिसात तक्रार करावतयास गेला असता त्याला अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे
Hits: 10