डबक्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि. ११ – पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पूर्वेकडील एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूला उघडकीस आली. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनिकेत यादव ( १३ ) असे मृत मुलाचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पोहोण्यास जात असल्याचे सांगून अनिकेत घराबाहेर पडला होता. मात्र काही तासानंतर अनिकेत घरी न आल्याने घरच्यांनी त्याच्या आजूबाजूला शोध सुरु केला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाव अजितला एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूकडील डबक्यात अनिकेत मृतदेह तरंगताना आढळून आला. अजितने तात्काळ घरच्यांना यांची माहिती दिली. रामनगर पोलिसांना कळविल्यानंतर अनिकेतचा मृतदेह डबक्यातून बाहेर काढण्यात आला. अनिकेतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालीकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email