ठेकेदार व महावितरणाचा वादात पन्नास वर्ष जुन्या धोकादायक पुलाचे काम रखडण्याची शक्यता …

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – मानपाडा रस्त्यावरील स्टार कॉलिनी – सागाव येथील येथील दहा मीटर रुंदीचा नाल्यावरील पूल धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे रुंदीकरण व नवीन १६ मीटर रुंदीचा पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असून यामुळे डोंबिवलीतील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. मात्र पुलाच्या उजवीकडे महावितरण कंपनीने उच्च दाबाची वीज वाहिनी असून ती हलवण्यासंदर्भात ठेकेदार व महावितरण यांच्यात वाद सुरु आहे. हे काम ठेकेदाराने करावे असे पत्र महावितरण कंपनीने दिले असून ठेकेदार मात्र हे काम  आमचे नसून महावितरण कंपनीचे असल्याचे सांगत आहे.  हे काम पावसाळ्यापूर्वी  होण्याची शक्यता नाही.दोघांमधील वादामुळे हे काम रखडण्याची शक्यता असून यामुळे डोंबिवलीकरांना नाहक त्रास करावा लागणार आहे.

 मानपाडा रस्त्यावरील स्टार कॉलनी सागाव येथील गांधीनगर नाल्यावर असून तो पन्नास वर्षांपूर्वीचा असून अरुंद व धोकादायक झाल्याने तो तोडून तेथे १६ मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा ठेका इंटरप्राईझेस कंपनीला देण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी या कामाला सुरुवात झाली असून पुलावरील वाहतूक बंद ठेवून अन्यत्र वळवण्यात आली आहे. मात्र पुलावर उजव्या बाजूला महावितरण कंपनीने अति उच्च दाबाची वाहिनी असून ती तेथून हलवत नाहीत तोपर्यत संपूर्ण पुलाचा भाग तोडता येणार नाही. महावितरण कंपनीने ही वाहिनी टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नव्हती असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हि अवस्था रिलायन्स कंपनीची असून त्याचीही वाहिनी उजव्या बाजूला आहे. या दोन्ही वाहिन्या हटवण्यात येत नाही तोपर्यत काम नीट करणे शकत नाही असे ठेकेदार संतोष सखे यांनी सांगितले. येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित आहे. मात्र दोघांच्या वादात हे काम होणे अवघड होणार आहे. या पुलासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. संकेत इंटरप्राईझेचे संतोष सखे यांना विचारले असता त्यांनी महावितरण कंपनीने उच्च दाबाची वीज वाहिनी हलवणे आवश्यक असून तोपर्यत काम सर्व होणे अशक्य असून यामुळे ठराविक मुदतीत काम होणे अवघड आहे तर महावितरण कंपनीने उपकार्यकारी अभियंत व्यंकटेश शेट्टी यांना विचारले असता सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले असून त्यांनीच ते काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

रिक्षाचालकांची लुट

    मानपाडा रस्त्यावरील शिवाजी उद्योग नगर जवळ असलेल्या बर्फाच्या कारखान्याजवळून वाहतूक वळवण्यात आली. रिक्षा चालकांनी अर्धा किमी अंतर जास्त जावे लागते याचाफायदा घेऊन रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्या ठिकाणी १० रुपये आकारण्यात येते त्याठिकाणी आता १५ -२० रुपये आकरण्यात येत असल्याची तक्रार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email