ठाण्यात साजरी झाली भारत-अमेरिका आंबेडकर विचाराची युनिव्हर्सल आंबेडकर जयंती
(श्रीराम कांदु)
ठाणे- असंख्य समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोर्ट नाका ठाणे येथे अभिवादन करण्यासाठी अमेरिकेतून भिक्कूणी खांम्पि खेमा वय वर्ष ६८ या प्रमुख पाहुण्या म्हणून भारतात ठाणे येथे आल्या होत्या. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले कि अमेरीकेत कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतासह जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान आहेत. १४ एप्रिल आंबेडकर जयंती दरवर्षी अमेरिकेसह जगभरात साजरी केली जाते आपण ठाणेकरांनी अमेरिकेला अभिवादन करण्यासाठी यजमान पद दिले यामुळे भारत-अमेरिका मधील आंबेडकर विचारांना बळकटी आली आहे
राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान व आधुनिक भारत परिवाराचे अध्यक्ष कर्मवीर सुनिल खांबे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती १३ एप्रिल रात्री १२ वाजता कोर्ट नाका ठाणे येथे असंख्य समाजाच्या वतीने कर्मवीर सुनिल खांबे व भिक्कूणी खांम्पि खेमा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पूर्ण कोर्ट नाका परिसरात हजारो नागरिक अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सुनील खांबे यांनी म्हटले कि अमेरिकेतून भिक्कूणी खांम्पि खेमा प्रमुख पाहुणे म्हणून १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिनी ठाण्यात येणे, यातून दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा युनिव्हर्सल विचारांचा संदेश महत्त्वाचा आहे.यामुळे ठाण्यात भारत-अमेरिका आंबेडकर विचाराची युनिव्हर्सल आंबेडकर जयंती साजरी होत आहे असे मला वाटते .यावेळी कर्मवीर सुनील खांबे यांना बहुजनसम्राट हा पुरस्कार कर्मवीर प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला
फराळाचे वाटप ,फटाक्यांची आतीषबाजी यामुळे वातावरण दुमदुमून गेले तसेच “निळ वादळ“ वाद्यवृंद सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांनी मार्गदर्शन केले . यावेळी सर्व राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते.असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात सुनील खांबे यांनी म्हटले आहे.