ठाण्यात गॅसची गळतीमुळे स्फोट, ६ जण जखमी
ठाण्यातील इंदिरानगर परिसरात गाडीतील गॅस सिलिंडरमधून गळती होऊन स्फोट झाल्याने ६ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली आहे. सिलिंडरमधून अचानक गळती झाली आणि गॅस आसपासच्या भागात पसरला. हा गॅस आगीच्या संपर्कात येऊन स्फोट झाला. यामध्ये मकबूल खान (२९) ५ टक्के भाजले असून गोमती प्रसाद शर्मा (५०) ९० टक्के, कमलावती गोमती शर्मा (४५) ९० टक्के, नारायण गोमती शर्मा (१०) ९० टक्के, शिवा गोमती शर्मा (१२) ९० टक्के भाजले आहेत. या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर बलीराम भंडारे (६०) हेही किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन अधिकाऱ्यांसह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत मदतकार्य केले.
Please follow and like us: