ठाण्यातील नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल;अपसंपदा मालमत्ता संपादित केल्याचा ठपका

( तेजस राजे )

परमार आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले आणि जामिनावर सुटलेले नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि त्यांच्या विविध निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या घरावर, कार्यालयावर शुक्रवारी अचानक पोलिसांनी छापेमारी केल्याने पुन्हा एकदा विक्रांत चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी चव्हाण यांच्यासह १२ जणांवर अपसंपदा मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक अजूनही चौकशी करीत असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

७ आक्टोंबर,२०१५ रोजी ठाण्यातील सुप्रसिद्ध बिल्डर आणि कॉसमॉस ग्रुपचे मुख्य संचालक सुरज परमार यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्यापूर्वी परमार यांनी तब्बल १६ पानाची सुसाईड नोट लिहली होती.

त्या सुसाईड नोटमध्ये विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, हनुमंत जगदाळे आणि नजीबमुल्ला यांची नावे लिहून ती खोडण्यात आली होती. त्यामुळे तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना संशय बळावला होता. अखेर सुसाईड नोटचा मतीतार्थ हा समजून पोलिसांनी या चार विद्यमान नगरसेवकांना अटक केली होती. त्यानंतर जामिनावर सर्वांची सुटकाही करण्यात आली.

दरम्यान तपासासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी नेमली होती. शुक्रवारी सकाळीच पोलीस पथकाने विक्रांत चव्हाण यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्ती यांच्या घरावर व कार्यालयावर छापामारी करीत चौकशी सुरु केली. विक्रांत चव्हाण यांनी अपसंपदा मालमत्ता संपादित केल्याचा संशय पोलीसांना होता. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी सकाळपासून विविध ११ ठिकाणी छापेमारी केली असून तीी संध्याकाळपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. छापेमारीत आक्षेपार्ह काय सापडले का ? याबाबत पोलीस सूत्रांनी माहिती दिली नाही. दरम्यान विक्रांत चव्हाण आणि त्याची पत्नी अरुणा चव्हाण यांनी एप्रिल २०१२ ते आक्टोंबर २०१५ या कालावधीत १३६.२७ टक्के अपसंपदा मालमत्ता संपादित केल्याने पोलिसांनी चितळसर पोलीस ठाण्यात या दाम्पत्यासह चव्हाण यांचे सासरे रवीन्द्रन केशव नायर,सासू शांता रवीन्द्रन नायर,कार्यकर्ते उमेश मायाप्पा कांबळे,संतोष भानुदास गावडे, प्रकाश काशिनाथ भोसले, भास्कर सुदर्शन गडांमी, अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित आणि कल्पतरू प्रॉपर्टीजचे व्हाईस प्रेसिडेंट संजय डागा यांच्या विरोधात लाचलुचप्त खात्याच्या पोलीस पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
यात डागा यांनी या प्रकरणात चव्हाण याना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग ठाणेेतपाससअधिकारी महादेव भोर,यांच्या नेतृत्वाखाली १० ठिकाणी चौकशी आणि तपासणी सुरु आहे. दरम्यान चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे महादेव भोर यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email